27/04/26
Breaking News

उमरा येथे सुशिक्षित तरुणांचा पशुपालन व्यवसायाकडे वाढता कल

पाथरी प्रतिनिधी
दिनांक 19/4/2026 रविवारी रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर उमरा येथे रतन बालासाहेब कोल्हे यांच्या शेळीपालन व्यवसायाच्या शेडचे भूमिपूजन डॉ के एन जाधव यांच्या हस्ते संपन्न झाल यावेळी तुकाराम महाडिक, महेश कौसडीकर, सुरेशराव नखाते, पप्पू केंद्रे शेतकरी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही दिवसात बाजारपेठेतील वाढलेली मागणी लक्षात घेता दुग्ध व्यवसाय बरोबरच कुक्कुटपालन शेळीपालन याकडे सुशिक्षित बेरोजगार तरुण पारंपारिक व्यवसायाला फाटा देत आधुनिक पद्धतीने पशुपालन व्यवसाय करण्याकडे मोठा कल दिसून येत आहे पंचक्रोशीतील उमरा अंधापुरी गोंडगाव गुंज तुरा या गावांमध्ये शेती व्यवसायाला पूरक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन शेळीपालन हा व्यवसाय बंदिस्त अर्धबंदिस्त व शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यावर पशुपालक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल दिसून येत आहे व याचबरोबर त्यांना जाधव साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन यशस्वी व्यवसायासाठी उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे

Check Also

“शाम ए सरगम” संगीत पारिवाराचा वर्धापनदिन साजरा

सेलु,दि 26 ः सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 …