26/04/26
Breaking News

सेलूत नृसिंह जन्मोस्तवाचे आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रम

सेलू ( प्रतिनिधी )
येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन असलेल्या नृसिंह मंदिर मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नरसिंह जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे
भगवान विष्णूच्या मुख्य दहा अवतारातील चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार आहे .

आपला भक्त प्रल्हाद संकटात सापडला असता त्याने धावा करताच समोर असलेल्या खांबातून प्रगट झालेला हा अत्यंत विक्राळ अवतार आहे .धड नराचे व मुख सिहांचे असल्यामुळे या अवतारास नरसिंह अवतार म्हणून ओळखले जाते .भक्त संकटात असतांना त्याच्या हाकेसरशी तो म्हणेल त्या ठिकाणी धावून जाणारा असा हा अवतार आहे .या नरसिंह अवताराचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .

यावर्षी देखील दि २२ एप्रिल ते ३ मे या कालावधीत नरसिंह जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.यामध्ये दररोज सकाळी श्री च्या मूर्तीस अभिषेक ,पूजा तसेच आरती होणार असून रात्री ८ वाजता येथील गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने गणपती अथर्वशीर्ष ,भगवतगीता अध्याय ,रामरक्षा तसेच विष्णुसहस्रनामाचे पठण केले जाणार आहे .
दि ३० एप्रिल रोजी सायंकाळी वाजता वेदमूर्ती तसेच भागवताचार्य नागनाथराव जोशी ( विडोळीकर )
यांच्या रसाळ व अमृत्यूल्य वाणी मधून सायंकाळी ७ वाजता नरसिंह जन्म अध्यायाचे निरूपण करून नरसिंह जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे .त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता श्री ची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे .दि १ मे रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दि २ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ” पिठलं भाकर “प्रसादचे आयोजन करण्यात आले आहे .दि ३ मे रोजी प्रक्षाळपुजेने कार्यक्रमाची सांगता होणार असून रात्री ९ वाजता गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने त्रिपदी व विडा भजन होणार आहे .
तरी सर्वांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन दर्शन ,तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन संस्थानचे पुजारी अनंत पाटील, केशव पाटील ,नारायण पाटील व देविदास पाटील यांनी केले आहे .

Check Also

“शाम ए सरगम” संगीत पारिवाराचा वर्धापनदिन साजरा

सेलु,दि 26 ः सेलू येथील प्रख्यात “शाम ए सरगम” संगीत परिवाराने दि. 24 एप्रिल 2026 …