पहा कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं दक्षिण कोकणामध्ये काही दुर्गम भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या मध्यम स्वरुपातील सरींची हजेरी असेल. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहणार असल्याच कारणानं किनारपट्टी भागांतील गावं, शहरांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
आज १३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. त्यामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरीसह ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यात शनिवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
Shabdraj www.shabdraj.com