04/02/26
Breaking News

Gemini ला कसं कळलं मला ‘त्या’ जागेवर तीळ आहे हे? तरुणी धक्क्यातून सावरेना, युजर्सही बुचकळ्यात

जेमिनीचा हा AI ट्रेंड सध्या जोरदार गाजतोय. अनेकजण साडीतील आपले फोटो अपलोड करताना दिसत आहेत. मात्र कोट्यवधी लोक वापरत असलेल्या या टूलच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने आपला अनुभव शेअर केल्यानंतर अनेकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.

 

झलक भवनानी हिने सांगितले की, “इन्स्टाग्रामवरील जेमिनी ट्रेंडने मलाही आकर्षित केले. मी हा ट्रेंड फॉलो करत ‘नॅनो बनाना’ फिचर वापरून काही फोटो तयार केले. सुरुवातीला माझे फोटो पाहून मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी एक फोटो अपलोड करून त्याला ‘रेट्रो साडी’ प्रॉम्प्ट दिलं. काही क्षणांतच जेमिनीने काळ्या साडीतला एक सुंदर फोटो तयार केला आणि तो मी सोशल मीडियावर पोस्टही केला. पण याच ठिकाणी प्रायव्हसीबाबतचा प्रश्न निर्माण झाला.”

 

गुगल जेमिनीचा सध्याचा ट्रेंड कसा चालतो? हा ट्रेंड काय आहे?
इन्स्टाग्रामवर सध्या गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना (Nano Banana) AI टूलचा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला आहे. या टूलद्वारे सेल्फी किंवा फोटोंना रेट्रो बॉलीवूड स्टाइलमध्ये, विशेषतः साडीतील इमेजेसमध्ये रूपांतरित केले जाते. यात 3D मॉडेल्सपासून ते व्हिंटेज साडी लुक्सपर्यंत अनेक स्टाइल्स पाहायला मिळतात.

 

यूजर्स आपले फोटो जेमिनी AI वर अपलोड करून साधा प्रॉम्प्ट लिहितात — उदा. “व्हिंटेज साडी लुक” किंवा “बॉलीवूड स्टाइल साडी”. काही क्षणांतच AI तो फोटो रेट्रो लुकमध्ये बदलून देते, ज्यामध्ये गोल्डन आवर लाइटिंग आणि सिनेमॅटिक बॅकड्रॉपसारखे इफेक्ट्स दिसतात.

 

हा ट्रेंड सुरक्षित आहे का?
पूर्णपणे सुरक्षित म्हणता येणार नाही. गुगल जेमिनीच्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसार, अपलोड केलेले फोटो AI ट्रेनिंगसाठी वापरले जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हसी, आयडेंटिटी थेफ्ट आणि सायबर फ्रॉडचा धोका वाढतो. याबाबत सायबर एक्स्पर्ट्स आणि जालंधर रूरल पोलिस यांनीही इशारा दिला आहे की फेशिअल डेटा अपलोड करताना सावधगिरी बाळगावी.

Check Also

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड विशेष गाडी धावणार

सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा नांदेड – सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण …