04/02/26
Breaking News

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या प्रक्रिया

सरकारने असा निर्णय घेतला आहे की, हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद असलेल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन केली जाईल. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे सदस्य म्हणून सहभागी असतील. त्यामुळे कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी आता संबंधित व्यक्तींनी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागेल.

अर्जाची प्रक्रिया
अर्जदारांनी सर्वप्रथम ‘आपले सरकार पोर्टल’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) द्वारे अर्ज ऑनलाइन सादर करावा. अर्ज पूर्ण झाल्यावर, त्याची प्रिंट काढून संबंधित तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र
जमिनीचे जुने रेकॉर्ड, जसे की 7/12 किंवा 8-A चा उतारा
‘कुणबी’ असा उल्लेख असलेले जुने सरकारी दाखले
वंशावळ किंवा कौटुंबिक इतिहास दर्शवणारे दस्तऐवज
शाळा सोडल्याचा दाखला, ज्यात ‘कुणबी’ जात नोंद आहे
पालक किंवा आजोबांच्या नावावर असलेले जुने जात प्रमाणपत्र
प्रशासनाने आश्वासन दिले आहे की, ज्या अर्जदारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

कशी आहे प्रक्रिया ?
-हैदराबाद गॅझेटमधील नोंदी शोधण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात
-या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असणार
-कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार
-हा अर्ज करण्यासाठी अर्जदार मराठा समाजातील भुधारक, भूमीहिन, शेतमजुर किंवा बटईने शेती करत असलेल्या जमीनीचा मालक असल्याचा पुरावा सादर करणे
-ज्या अर्ज दारांकडे पुरावा नाही त्यांना 13 ऑक्टोबर, 1967 पूर्वीचे त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावा लागेल
-अर्जदाराने त्यांच्या कुळातील व्यक्तींना कोणते प्रमाणपत्र मिळाले व त्यांच्या नातेवाईकांचे कुणबी असल्याचे संबधीत प्रतिज्ञापत्र सादर करावे
-अर्जदार अर्जाच्या पृष्ठत असणारे इतर पुरावे सादर करु शकतील
-तालुकास्तरीय समितीकडे हा अर्ज गेल्यानंतर ही समिती त्याची तपासणी करेल आणि गाव पातळीवर गठीत समितीकडे चौकशीसाठी पाठवेल
-गाव पातळीवर गठीत समिती अर्जदाराची पोलिस पाटील, गावातील ज्येष्ठ नागरीकासमक्ष चौकशी करुन अहवाल तालुकास्तरीय समितीकडे पाठवेल
-तालुकास्तरीय समिती गाव पातळीवर गठीत समितीने पाठवलेला अहवालाचे अवलोकन करेल
-त्यानंतर तालुका समिती अर्जावर शिफारस करेल व त्यानुसार अर्जावर विहित कार्यपद्धतीने सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यईल

Check Also

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड विशेष गाडी धावणार

सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा नांदेड – सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण …