17/07/26
Breaking News

देऊळगाव गात येथील सिमेंट काँक्रीटचे रस्त्याचे उदघाटन

सेलू ( प्रतिनिधी )
देऊळगाव गात येथे सिमेंट रस्त्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती .
शिवसेना पक्षाचे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या प्रयत्नातून या कामाला गती मिळाली असून या रस्त्यांचे भूमिपूजन दि २५ मे गुरुवार रोजी सकाळी मा. आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते पार पडले .

या रस्त्याच्या कामासाठी हनुमान गात यांनी पाठपुरावा केला होता. देऊळगाव गात येथील अहिल्याबाई होळकर नगर या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

गेल्या १० ते १५ वर्षांपासून अहिल्यानगर भागातील काही रस्त्यांची कामे प्रलंबित होती. याबाबत मा. आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्याकडे सतत एक वर्षांपासून पाठपुरावा केला. या जनहिताच्या मागण्यांना माननीय आमदार हरिभाऊ काका यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात २० लाख रुपये रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात सुरुवात करण्यात आली असून पुढच्या टप्प्यात आणखी दोन ते तीन कोटींच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांची कामे देऊळगाव गात भागात करण्यात येणार असल्याचे मा. आमदार हरिभाऊ काका यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले .
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबा काटकर, शहर प्रमुख पांडू कावळे माजी नगरसेवक अविनाश शेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दतराव कदम, पंचायत समिती सदस्य शिवराम कदम, माजी जिल्हा परिषदेचे शिवाजीराव कदम, दत्तराव नाना कदम श्याम कदम , विश्वनाथ मांडाखळीकर, शिवाजीराव कदम ,गोरख कदम, नारायणराव काका कदम, व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …