27/07/26
Breaking News

“कोंडी” कथासंग्रह म्हणजे संघर्षशील व्यक्तीचा प्रवास – प्रा.डॉ. कीर्तीकुमार मोरे

सेलू ( प्रतिनिधी )
शेतमालाचे भाव कोसळल्यावर शेतकऱ्यांच्या मनं सुन्न करणारी अवस्था ,भूक,स्त्री , शोषण आणि कठीण परिस्थिशी दोन हात करणाऱ्या संघर्षशील व्यक्तीचा ठाव घेणारा कोंडी या कथासंग्रहातून होते. असं प्रतिपादन प्रा. डॉ. कीर्तीकुमार मोरे यांनी सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या एक दिवस एक पुस्तक व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने ३६ वे पुष्प गुंफताना केले.

येथील हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.के. डी. वाघमारे हे होते. कथाकार राजेंद्र गहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मोरे पुढे म्हणाले की. कोंडी कथासंग्रहातील व्यक्तिं आपल्या भोवतालच्या असल्याने या कथा प्रत्येकाला आपल्यासा वाटतात.

यावेळी ग्रंथालयाचे सल्लागार हेमंतराव आडळकर यांचा न.प.स्वीकृत सदस्य झाल्या बद्दल तर जिल्हास्तरीय पहिले अक्षर साहित्य संमेलन यशस्वी केल्या बद्दल संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, कार्याध्यक्ष राम निकम, उपाध्यक्ष जयप्रकाश बिहाणी,कुरुणा बागले,
कोषाध्यक्ष प्रा डॉ सतीश मगर यांचा आणि धुळधाण कादंबरीचे कादंबरीकार गंगाधर गायकवाड यांचा अनुसया राघोजी जाधव स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथालयाच्या वतीने महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, दत्तात्रय माकोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी तर सुत्रसंचलन पांडुरंग पाटणकर यांनी केले . चंद्रशेखर मुळावेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

या कार्यक्रमासाठी मोहन कुलकर्णी ( परभणी ) जयंत नाईक ,रतन दायमा, रवि कुलकर्णी,सोमेशवर गिराम, डॉ.अशोक पाठक, मुस्ताक रब्बानी, आप्पासाहेब गाडेकर, संभाजी रोडगे,पुनमचंद खोना, श्रीपाद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती

Check Also

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …