24/03/26
Breaking News

स्माईल शिल्ड दंत व मुखरोग दवाखान्यात लेझर मशीन सुविधा उपलब्ध

सेलू / प्रतिनिधी – येथील बाबासाहेब मंदिर रोडवरील डॉ निरज परशराम चचेडिया यांच्या स्माईल शिल्ड दंत व मुखरोग रुग्णालयात रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे एक नवीन पर्व सुरू करण्यात आले असून त्याचा मोठा फायदा दंत व मुखरोग असलेल्या रुग्णांना वरदानच ठरणार आहे .

यामध्ये रुग्णांवर लेझर मशीन ,वेलोस्कोप डायग्नोस्टिक तसेच ओझोन इन्फ्युजन मशीन च्या सहाय्याने नवीनतम तांत्रिक प्रगतीतून उपचार केले जाणार आहेत .

मुख्यत्वेकरून तोंडात आणि दातांमध्ये तंबाखू चघळण्याशी संबंधित लक्षणे यशस्वीरीत्या दूर करून त्याचे निराकरण करता येणार आहे.
हे एक मुखरोग जागृती कडे वाढवलेले पाऊल कित्येक जनांचे जीवन सुखी व समाधानी बनवण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे .
तरी परिसरातील सर्व रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉ निरज चचेडिया यांनी केले आहे .

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …