04/02/26
Breaking News

कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

पाथरी / प्रतिनिधी – पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, मानवत संचलित कै. स. गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवनांद्रा (ता. पाथरी) येथील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

दि. 23 जानेवारी 2026 रोजी प्रभावती विद्यालय, परभणी येथे पार पडलेल्या 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील विद्यार्थी चि. अधिराज सुधाकर फुलपगारचि. यशराज रघुनाथ ताठे यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी यापूर्वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात “शाश्वत शेती” या विषयावर सादर केलेल्या प्रयोगास तृतीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पात्रता मिळवली होती.

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत पुन्हा तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे त्यांची दि. 28 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित विज्ञान महाविद्यालय, काँग्रेस नगर, नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री. मोकरे एम. एम., सौ. सीमा गायकवाड, सौ. नीता कोल्हे, श्री. हर्षवर्धन नाथभजन, श्री. पिंपळगावकर जी. बी. व श्री. लहाने एस. एम. यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, मानवत या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विजयकुमार कत्रुवार, उपाध्यक्ष मा. श्री अनिल भाऊ नखाते, सचिव मा. श्री बालकिशनजी चांडक, सहसचिव मा. श्री विजयकुमारजी दलाल, सदस्य मा. श्री दिलीपरावजी हिबारे व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री होगे बी. आर., पर्यवेक्षक श्री तायनाक एन. बी., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …