04/02/26
Breaking News

मार्केट कमेटीच्या यार्डात भरला जनावरांचा बाजार

सेलू / प्रतिनिधी – आज दिनांक 25 /10 /2025 वार शनिवार रोजी बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड पाथरी रोड सेलू येथे जनावरांचा बाजार भरवण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समितीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच जनावरांचा बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड येथे भरवण्यात आला.

 

या अगोदर जनावरांचा बाजार हा नगरपरिषद अंतर्गत होता परंतु तो बंद झाल्यामुळे माननीय सभापती यांच्या प्रयत्नमुळे हे शक्य झालेले आहे.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, संचालक दत्तराव कदम, केशव सोळंके, भास्करराव पडघन, ज्ञानेश्वर राऊत, ॲड. कृष्णा शेरे बाजार समितीचे प्रभारी सचिव दीपक शिंगणे तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. आज रोजी चार जनावरांचे व्यवहार झाले . जनावरांच्या बाजारामध्ये प्रामुख्याने व्यापारी नूर मे शामुद्दीन, रजाक भाई कुरेशी, शकील कुरेशी, शेख युनुस शेख चांद दिगंबर ज्ञानोबा आवस्कर, रामेश्वर प्रल्हादराव घुले होते. याप्रसंगी सभापती डॉ. संजय रोडगे यांनी जनावरे विक्री आणलेल्या शेतकऱ्यांशी व तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना जनावराच्या बाजारासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासित केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा शेरे यांनी केले व त्यानंतर बाजार समितीचे संचालक श्री दत्तराव कदम यांनी शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मोठ्या संख्येने जनावराच्या बाजारात सहभागी होण्याबाबत आवाहन केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …