09/05/26
Breaking News

गंगाखेडात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

गंगाखेड / प्रतिनिधी  – महाराष्ट्र राज्याच्या ६७व्या वर्धापन दिनानिमित्त गंगाखेड शहरात विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शिरतोडे, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक नेते बाळासाहेब राखे यांनी केले.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा व्यापारी महासंघांचे अध्यक्ष दगडुशेठ सोमाणी, केशव देशमुख, व्हॉईस ऑफ मीडियाचे रामप्रसाद ओझा, नगरसेवक अनिल यानपल्लेवार, संदीप राठोड, माजी सदस्य दिपक तापडिया, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, शिक्षक रविंद्र मुंडे, रविंद्र सालमोटे, नागरगोजे, तलाठी, विविध विभागांचे कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष हनुमंत मुंडे व इतर सदस्य उपस्थित होते.

 

नगर परिषद कार्यालय येथेही ध्वजारोहण सोहळा
नगर परिषद कार्यालय येथे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगरसेवक गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे, पालिका अधीक्षक नागनाथ साळवे, लक्ष्मीकांत तातोडे, महावीर नवले, मुकुंद कोकड, संजय यादव, सरेश मनियार, अधिकारी अभियंता प्रफुल्ल साळवे, अमोल तांदळे, शहरातील व्यापारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑनलाईन स्वगणनेला आजपासून सुरुवात
“नागरिकांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन स्वगणनेत सहभागी होऊन शहराच्या विकास प्रक्रियेला बळ द्यावे,” असे आवाहन नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांनी प्रतिनिधीशी बोलताना केले.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …