17/07/26
Breaking News

खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी माणिक लोडे तर उपसभापतीपदी निखिल बांगर यांची बिनविरोध निवड

हिंगोली(प्रतिनिधी)
येथील खरेदी विक्री संघाच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये सभापती पदी भारतीय जनता पार्टीचे माणिक लोडे तर उपसभापती पदी निखिल बांगर यांची सर्व संचालकांनी एकमताने निवड केली आहे. या निवडीनंतर भाजपा आणि मित्र पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आली होती. सभापती पदासाठी माणिक लोडे व उपसभापती पदासाठी निखिल बांगर यांचेच एकमेव अर्ज आल्यामुळे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध आणि एकमताने झाल्याचे घोषित केले यावेळी संचालक उमेश नागरे,नारायण इंगोले, विठोबा मुटकुळे,भानुदास वामन, सदाशिव थोरात, रमेश चौधरी,सौ.किरण बर्वे आणि सौ.सरस्वती जाधव उपस्थित होते.
यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार तान्हाजीराव मुटकुळे,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांनी सभापती व उपसभापतीचे सत्कार केले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,जेष्ठ नेते के.के शिंदे,माजी जि.प सदस्य प्रकाशराव थोरात,प्रा.गुलाब भोयर,नारायण खेडेकर,जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,उत्तमराव जगताप,शहराध्यक्ष रजनीश पुरोहित,कार्याध्यक्ष पवन उपाध्ये,नगरसेवक हमीद प्यारेवाले,बंडु करहाळे,संतोष टेकाळे,मनोज शर्मा,,सदाशिव सुर्यतळ,श्रीरंग राठोड,संदीप वाकडे,राजेश बांगर,सचिन बांगर,बळीराम गुठ्ठे,अमित रुहाटिया यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित सभापती माणिक लोडे म्हणाले की कार्यसम्राट आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्यासह सर्व संचालकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातील. तालुक्यात कापूस, सोयाबीन व इतर शेतीमालाच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यावर आमचा भर राहील. तर उपसभापती निखिल बांगर यांनीही सर्वांचे आभार मानत संघाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …