हिंगोली(प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि मोदी सरकारच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, जून महिन्यात हिंगोली शहरात विविध सामाजिक व रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वप्रथम मागील वर्षी लावेल्या झाडांचे सौ.जिजाबाई मुटकुळे यांनी पुजन केले यानंतर वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात खासदार रामराव वडकुते,आमदार तान्हाजीराव मुटकुळे,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,युवामोर्चा अध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे,जेष्ठ नेते के.के शिंदे,नारायण खेडेकर,माजी जि.प सदस्य प्रकाश थोरात,जिल्हा सरचिटणिस उमेश नागरे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,शहराध्यक्ष रजनीश पुरोहित,कार्याध्यक्ष पवन उपाध्ये,नगरसेवक हमीद प्यारेवाले,माणिक लोडे,संतोष टेकाळे,बाबाराव घुगे,मनोज शर्मा,नरेश अग्रवाल,बंडु करहाळे,सदाशिव सुर्यतळ,श्रीरंग राठोड,संदीप वाकडे,अमित रुहाटिया,सचिन शिंदे,आशिष जैस्वाल,डॉ.भानुदास वामन,मुकुंद नायक,चांदु लांडगे,विशाल दुधळकर,मंहमद प्यारेवाले यांच्यासह वनविभागाचे आधिकारी संदीप शिंदे,संदीप वाघ,गोपाल बिरसवने,जयश्री बरगे उपस्थित होत्या.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आ.मुटकुळे यांच्या निवासस्थाना बाहेरील परिसर व महाकालींका मंदीर तसेच विविध प्रमुख भागांत आणि खुल्या मैदानांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले केवळ झाडे लावणे एवढाच उद्देश नसून, या झाडांच्या जगवणुकीची आणि संवर्धनाची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवरानी केले.
Shabdraj www.shabdraj.com