17/07/26
Breaking News

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित,परभणीची जागा….

राज्यात आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जवळपास निश्चित झाला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. विधानपरिषदेच्या एकूण 17 जागांवर महाविकास आघाडीत पूर्ण एकमत झाले आहे.

1 जून 2026 हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी मिळून सर्व जागांवर पूर्ण ताकदीने लढणार आहे. जागावाटपाच्या या सूत्रात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजेच 8 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला 3 जागा मिळाल्या आहेत.

 महाविकास आघाडीचा जागावाटपाचा संपूर्ण फॉर्म्युला

काँग्रेस – एकूण 8 जागा

चंद्रपूर

यवतमाळ

भंडारा

अमरावती

अहिल्यानगर

सोलापूर

धाराशिव

नागपूर – पोटनिवडणूक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  एकूण 6 जागा

रायगड

जळगाव

परभणी-हिंगोली

छत्रपती संभाजीनगर

नांदेड

नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट- एकूण 3 जागा

पुणे,ठाणे ,सांगली-सातारा

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …