परभणी,दि 15
परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड येथे महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी सोमवारी दि.15 रोजी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त करत भरघोस पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सईद खान व आमदार गुट्टे यांच्यात आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त करत भरघोस पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच मतदारसंघातील विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका आणि जनतेच्या अपेक्षांबाबत सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली.
याच प्रसंगी गंगाखेड नगर परिषदेचे बांधकाम सभापती ॲड. कलिम शेख यांचा वाढदिवस स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनामुळे आगामी निवडणुकीसाठी अधिक बळ आणि प्रेरणा मिळाली. ही भेट निश्चितच उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरली. यावेळी महायुतीचे नगरसेवक, संपर्कप्रमुख आनंद जाधव, योगेश जानकर,बाळासाहेब किसवे तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com