16/06/26
Breaking News

क्रीडा संस्कृती म्हणजे आरोग्य आणि एकीचा पाया – आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

गंगाखेड (प्रतिनिधी) : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी क्रीडा संस्कृती ही तणावमुक्ती, आरोग्य आणि सामाजिक एकीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले. शहरातील क्रीडा संकुलाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. दररोज किमान ३० मिनिटे खेळ केल्यास लठ्ठपणा, मधुमेह व रक्तदाबासारखे आजार दूर राहतात. कबड्डी, खो-खो, कुस्ती यांसारखे पारंपरिक खेळ तरुणांना नशा व मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवून सांघिक भावना वाढवतात, असे त्यांनी सांगितले.
क्रीडा संकुलातील रनिंग ट्रॅक व स्विमिंग पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास शिस्त, नेतृत्वगुण, टीमवर्क व टाइम मॅनेजमेंट विकसित होऊन शहरातील व ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उषाकिरण शृंगारे, आत्माराम टेंगसे, गीता साखरे, कल्याण पोले, संजय मुंडे, गणेश सकुंडे, डॉ. चंद्रकांत सातपुते आणि प्रा. उजळंबे उपस्थित होते.

Check Also

 ‘वनामकृवि’ व ‘मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार!

हिंगोली: मराठवाडा व राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक …