04/02/26
Breaking News

निसर्गाचा कोप… काहीच शिल्लक राहीले नाही,आता थेट मदत करा

कैलास चव्हाण
परभणी,दि 13
परभणी जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सोयाबीन कापूस काहीच राहिले नसून यामुळे पंचनामे करण्यासाठी अनेक भागात सोयाबीन शिल्लक नाही माती देखील वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने आता थेट सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे

यंदाच्या खरीप हंगामात सातत्याने अतिवृष्टीचे संकट आले आहे ऑगस्ट महिन्यात पंधरा दिवस सतत अतिवृष्टी झाली यामुळे मूळ घोडीत हे पीक नष्ट झाले सोयाबीनही फटका बसला त्यातूनही कसेबसे वाचलेले सोयाबीन शुक्रवारी झालेल्या पावसाने पूर्ण वाहून गेली आहे सोयाबीन कापूस यास अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे
यंदा जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल की नाही याबाबत शंका आहे तसेच शासनाने ई पीक पाहणी सह विविध अटी आणि शर्ती लावल्या त्यामुळे शासकीय मदतीला देखील अडचणी येत आहेत अनेक शेतकऱ्यांना ईपीक पाहणीसह आणि बाबी अद्याप समजत नसल्याने शासनाने थेट सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.
पूर्णा : तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून मोठा पूर आला. या पुराचा फटका पांगरा गावालाही बसला. गावाजवळील नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने शेतात घुसून रस्ते व पिके खरडून नेली.वेगाने वाहणाऱ्या पाण्याने नदीकाठच्या शेतांतील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. तुकाराम ढोणे, विठ्ठल केरबाजी ढोणे, नरहरी ढोणे, पंडित ढोणे, कुंडलिक ढोणे, मनोहर ढोणे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे जवळपास दहा एकर सोयाबीन पीक वाहून गेले.चबरोबर पांगरा, तरंगल, वाई, पिंपळा लोखंडे, लोणधार, हिवरा, सोनखेड, रेगाव, धोतरा, चुडावा, कावलगाव परिसरातील नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. चुडावा महसूल मंडळात यंदा चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली असून खरीप हंगाम जवळपास पूर्णतः फसल्याची स्थिती आहे.

पूर्णा-चुडावा मंडळात ढगफुटी

दरम्यान, शुक्रवारी दुपारपासून सुरु झालेल्या जोरदार पाऊसाचे पुर्णा-चुडावा महसूल मंडळात ३ ते ४ वाजेपर्यंत ढगफुटी सदृष्य पध्दतीत रुपांतर झाले. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर येऊन पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत. ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतातील माणसे अडकून पडली आहेत. तर वाई लासीना येथे हळदी पिकात पाणी शिरले आहे.तालुक्यातील ताडकळस व परिसरात गेल्या महिनाभरापासून सतत पावसाची हजेरी असून, गेल्या दोन दिवसांत तर मुसळधार पावसाने कहर केला आहे. गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) सकाळी तब्बल दोन तास जोरदार पाऊस झाला, तर शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) दुपारपासून संध्याकाळपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …