परभणी,दि 03 ः
राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना अनुशासन, शिस्त, देशसेवा आणि देशप्रेम शिकवले जाते. कॅडेटनी याचा फायदा घेत अनुशासित व्हावे आणि देशसेवेसाठी सज्ज राहावे असे आवाहन एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिग्रेडियर अनुप बरबरे यांनी मंगळवारी (दि.०२) रोजी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे परीक्षण करण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी कमांडिंग ऑफिसर के दिलीप रेड्डी, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, एनसीसी विभागप्रमुख मेजर डॉ. प्रशांत सराफ उपस्थित होते. पुढे बोलताना ब्रिगेडियर म्हणाले, देशाचा सन्मान,आपली ध्येय, संस्कार, आई-वडिलांचा सन्मान, गुरुजनांचा सन्मान करीत नवीन गोष्टी शिकण्याचे ध्येय बाळगावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी युनिटचे परीक्षण केले. नंतर त्यांनी कॅडेटचे कौतुक करून महाविद्यालय एनसीसीसाठी देत असलेल्या सुविधेबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. त्यांच्या अतिथ्यप्रित्यर्थ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. एनसीसी विभागाच्या महाविद्यालयात वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.सुरेंद्र येनोरकर, डॉ. विजय परसोडे, एनसीसी कॅडेट भागवत पांढरे, आत्मलिंग गलांडे, जय कदम, अजित जाधव, महेश शिंदे, रूपाली गोटे, अश्विनी लोंढे, किशोरी राखुंडे, मोहिनी चव्हाण, पल्लवी राऊत, सुरेश पेदापल्ली, सय्यद सादिक, साहेबराव येलेवाड,अमित बिडला आदींनी पुढाकार घेतला
Shabdraj www.shabdraj.com