सेलू,दि.22
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकरच्या वतीने आयोजित DBC Science Expo 2026 मध्ये नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती (मॉडेल्स), सेमिनार सादरीकरणे तसेच संशोधन पोस्टर्स प्रभावीपणे सादर केली. यामध्ये समर्थ सचिन कुंडीकर यास सेमिनार सादरीकरण मध्ये तृतीय क्रमांक तर यज्ञेश दिगंबरराव जोशी यास पोस्टर सादरीकरणमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपले वैज्ञानिक ज्ञान, सर्जनशीलता तसेच नाविन्यपूर्ण संशोधन कल्पना सादर करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले.
या यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शकांचे
अभिनंदन नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ. व्ही.के.कोठेकर,सहचिटणीस श्री.जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ.शरद एस.कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यू.सी.राठोड,उपप्राचार्य डॉ.आर.एम.खाडप,
IQACच्या समन्वयक डॉ.एन. एस. पद्मावत, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश कंठाळे यांनी डॉ.अमित कुलकर्णी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
Shabdraj www.shabdraj.com