जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता देशात केवळ दोनच टॅक्स स्लॅब्स असतील, तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय, 33 जीवनावश्यक औषधांवर आता जीएसटी लागणार नाही. याआधी या औषधांवर 12% कर आकारला जात होता. हे नवीन बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
आजच्या काळात अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करणे खूप महाग आहे. या औषधांवरील जीएसटी रद्द केल्याने रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक फायदा होईल. महागडी औषधे घेण्यास अडचणी येत असलेल्या कुटुंबांना या निर्णयामुळे फायदा होील. या 33 औषधांमध्ये कर्करोग, रक्त विकार, दुर्मिळ अनुवांशिक आजार आणि इतर गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या औषधांचा समावेश आहे.
आता फक्त दोनच जीएसटी स्लॅब
जीएसटी कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत 5% आणि 18% असे दोन कर स्लॅब निश्चित करण्यात आले आहेत. साबण, सायकल, टीव्ही, तसेच वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा पॉलिसीसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. गुटखा, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेट वगळता इतर सर्व उत्पादनांवर हे नवीन दर लागू होतील. हे बदल 22 सप्टेंबरपासून, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून अंमलात येणार आहेत.
दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा या वस्तूंवर काहीही जीएसटी लागणार नाही असा प्रस्ताव आहे. तसंच पेन्सील, कटर, रबरर आणि वह्या यांवरच्या १२ टक्के जीएसटी हटवण्यात आला आहे. शॅम्पू, साबण, तेल या दैनंदिन वापरातील वस्तू ५ टक्के जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेल्या आहेत. नमकीन पदार्थ, पास्ता, कॉफी, नूडल्स यांच्यावरचा जीएसटीही ५ टक्के करण्यात आला आहे. थर्मामीटर आणि ग्लुकोमीटर यांच्यावरचा जीएसटीही १८ वरुन ५ टक्के करण्यात आला आहे. चीज आणि लोणी यावरचा टॅक्स १२ वरुन ५ टक्के करण्यात आला आहे.
कार, बाईक, थ्री व्हिलर, एसी, फ्रिज अशा सगळ्या वस्तूंवर असलेला २८ टक्के जीएसटी आता १८ टक्के करण्यात आला आहे. तसंच सिमेंटवरचा जीएसटीही १८ टक्के करण्यात आला आहे. ३५० सीसीच्या बाईक आणि त्यांचे ऑटो पार्ट्स हेदेखील १८ टक्क्यांच्या कक्षेत आणण्यात आले आहेत.
Shabdraj www.shabdraj.com