हिंगोली (प्रतिनिधी)
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे आणि त्यांच्या सुनबाई सौ. राजामती शिवाजीराव मुटकुळे यांनी आपले उमेदवारी अर्ज परभाणी येथे दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, सहकाराची समृद्ध परंपरा जपत जिल्ह्यातील शेतकरी, बँक सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत. बँकेच्या माध्यमातून तळागाळातील घटकांचा आर्थिक विकास साधणे आणि पारदर्शक कारभाराद्वारे सहकार क्षेत्र अधिक बळकट करणे हाच आमचा मुख्य संकल्प आहे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,जेष्ठ नेते के.के शिंदे,माजी जि.प सदस्य प्रकाशराव थोरात,भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे,नारायण खेडेकर,संतोष टेकाळे,माणीक लोडे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,शहराध्यक्ष रजनीश पुरोहीत,पवन उपाध्ये,नगरसेवक हमीद प्यारेवाले,ॲड राजु गोटे,सचिन शिंदे,पदमाकर नायक,श्रिरंग राठोड,भानुदास वामन,रामदास चव्हाण,भाऊराव ठाकरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, सहकारी क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com