गंगाखेड, प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ गंगाखेड शहरात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदार संजय जाधव यांनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जनतेच्या मतांवर निवडून येऊन पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, अशा भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली खासदार बंडू जाधव यांच्या प्रतितात्मक पुतळ्याच दहनकरून जोरदार घोषणा बाजी केली
या आंदोलनात उपजिल्हाप्रमख माधव शेंडगे, उपजिल्हाप्रमुख साहेबराव कल्याणकर, बाळासाहेब लोखंडे, शिक्षक सेना नेते बाळासाहेब राखे, माधवराव देसाई, गंगाखेड तालुकाप्रमुख जानकीराम पवार, पालम तालुकाप्रमुख बापूराव पोळ, छगन मोरे, मुखराम शेख, अमोल खटिंग, भागवत शिंदे, धोंडीराम जाधव, सिद्धेश्वर मुरकुटे, ज्ञानोबा आंधळे, गोविंदराव काळे, मोहन गुंजकर, नागेश कोणार्डे , अर्जुन आंधळे, शंभूदेव मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले असून या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
Shabdraj www.shabdraj.com