17/10/26
Breaking News

पानकन्हेरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सेनगाव,दि 20 (प्रतिनिधी)
सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी धाड टाकून कारवाई केली. अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही जण विनापरवाना ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या कारवाईत 4 हजार 400 रुपये रोख रक्कम, तीन मोटारसायकली, तीन मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 78 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी अशोक हेंद्रे, अमोल राऊतकर, शंकरराव देशमुख, अनिल जाधव, कैलास जाधव, प्रविण वाठोरे, बाबाराव बांगर व घनश्याम दायमा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाडीदरम्यान तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांना समजपत्र देऊन सोडण्यात आले. पुढील तपास सेनगाव पोलीस करीत आहेत.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …