यशवाडी मंदिराचा गाभारा कोसळला,बचावकार्य सुरु
परभणी,दि 20
परभणी ते मानवत या रस्त्यावरील कोल्हा शिवारातील यशवाडी येथील मंदिराचा गाभारा कोसळून काही भाविक दबले आहेत.बचाव कार्य सुरु झाले आहे.
या मंदिराच्या गाभार्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. या गाभार्याच्या बांधकामात दगडांचा वापर होत होता. आज शनिवार रोजी या मंदिरात भाविकांची दर्शनाकरीता मोठी गर्दी उसळली. त्यावेळी गाभार्याचा काहीसा भाग विशेषतः दगड कोसळून काही भावीक दबून मृत्यू पावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अनेक जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले असुन प्रशासनातील अधिकारी दाखल झाले आहेत.30 ते 40 भावीक खाली असल्याची माहीती मिळत आहे.

Shabdraj www.shabdraj.com