17/10/26
Breaking News

माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रमोद मुंदडा तर सचिवपदी प्रशांत सोनी यांची निवड

हिंगोली,दि 08 ः
हिंगोली जिल्हा महेश्वरी सभेच्या संघटनात्मक निवडणूका 2026 ते 29 या वर्षा करिता घेण्यात आल्या असता त्यात सर्व पदांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निर्वाचन अधिकारी म्हणून ॲड. हरिष मुरक्या व सहाय्यक सिए. रामदेव सोनी, यांनी काम पाहिले.प्रमोद मुंदडा हिंगोली जिल्हा अध्यक्ष, सुरेश धुत जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत सोनी जिल्हा सचिव, बालमुकुंद जेथलिया सेनगाव जिल्हा सहसचिव, श्याम मंत्री वसमत जिल्हा कोषाध्यक्ष, उमेश सोमाणी कळमनुरी जिल्हा संघटन मंत्री, सुमित लखोटिया जवळा बाजार जिल्हा प्रचार प्रसार मंत्री अशी निवड करण्यात आली .
या बैठकीला बंकटलाल गट्टानी,नंदकिशोर तोष्णीवाल, बद्रीनारायण सारडा,कमल दरक, योगेश तोष्णीवाल, शैलेश तोष्णीवाल, पवन राठी, प्रविण चांडक, आशिष पोरवाल, लक्ष्मीरमण काबरा, संजय सोमाणी, श्रीराम सोमाणी, राहूल लाहोटी, संजय काबरा, योगेश तोष्णीवाल वसमत, सौ. राजश्री किशोर मुंदडा, सौ. सुषमा विनोद चितलांगीया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …