22/07/26
Breaking News

युवा शिवसेना जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या हस्ते PSI अजय सूर्यवंशी पाटील यांचा सत्कार

हिंगोली,दि 02 ःढ
येथे अजय उत्तमराव सूर्यवंशी पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याबद्दल युवा शिवसेना जिल्हा प्रमुख राम कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेतकरी कुटुंबातील अजय सूर्यवंशी यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजय यांच्या निवडीची माहिती मिळताच हिंगोली येथे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, मित्रपरिवार तसेच मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पूर्णा तालुक्यात 5.5 कोटींची शेतकरी फसवणूक; 6,800 क्विंटल शेतमाल घेऊन भुसार व्यापारी फरार

₹5.5 Crore Farmer Scam! Trader Absconds with 6,800 Quintals of Produce पूर्णा प्रतिनिधी / सुशील …