06/06/26
Breaking News

आधीकमास पोर्णीमे निमित्त गोदावरी महाआरती थाटामाटात संपन्न

गंगाखेड | प्रतिनिधी रामप्रसाद ओझा
आधीकमास (पुरुषोत्तम मास) पोर्णीमेच्या पावन पर्वावर गंगाखेड शहरातील दक्षिण वाहिनी नाभी क्षेत्र असलेल्या गोदावरी घाटावर गोदावरी नदी आरती उत्सव समितीच्या वतीने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यंदा पुरुषोत्तम मासाचे विशेष महत्त्व असल्याने या महाआरतीसाठी शहर व परिसरातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
आयोजकांनी सुरुवातीला १११ महिलांची नोंदणी उद्दिष्ट ठेवली होती. मात्र भक्तिभावाने ओतप्रोत प्रतिसाद मिळत तब्बल ३५१ महिलांची विक्रमी नोंदणी झाली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर गोदावरी घाटावर महिलांची गर्दी वाढत गेली आणि आरती व महाप्रसादाच्या वेळी संपूर्ण घाट भक्तीमय वातावरणाने गजबजून गेला.
या पोर्णीमा महाआरतीचे मुख्य यजमानपद सौ. शांता बाबुलाल ओझा यांनी स्वीकारले. आरती, महाप्रसाद व पूजाविधी अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावाने पार पडले. ज्येष्ठ महिला, युवती तसेच धोंडेजेवणानिमित्त माहेरी आलेल्या माहेरवाशिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला. अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि भाविक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य यजमान सौ. शांता ओझा यांच्यासह नगरसेविका सौ. शैला ओझा, सौ. अनिता ओझा, सौ. अंजली ओझा, सौ. ममता ओझा यांनी विशेष सहकार्य केले. तसेच आयोजक ॲड. स्मिता देशमुख, सौ. प्रभाताई राजेंद्र, डॉ. प्रतिभाताई वाघमारे, सौ. शिवमालाताई लांडगे, सौ. दिव्या बंग, प्रेमलता नावंदर, सौ. भावना कंधारकर, सौ. पद्मवार, सौ. कळपे यांनी परिश्रम घेऊन उत्सव अत्यंत भक्तिभावात व थाटामाटात साजरा केला.
गोदावरी मातेच्या जयघोषात संपन्न झालेल्या या महाआरतीने गंगाखेडच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले. चौकट -आधीकमास पोर्णीमा विशेष – गोदावरी महाआरती
✨ भक्ती, परंपरा आणि महिलांची शक्ती यांचा संगम ✨
🔸 दक्षिण वाहिनी नाभी क्षेत्र, गोदावरी घाट – गंगाखेड
🔸 आधीकमास (पुरुषोत्तम मास) पोर्णीमा निमित्त भव्य आयोजन
🔸 उद्दिष्ट १११ महिला… प्रत्यक्ष सहभाग तब्बल ३५१ महिलांचा!
🔸 संपूर्ण गोदावरी घाट भक्तिरसात न्हाऊन निघाला
🙏 मुख्य यजमान:
सौ. शांता बाबुलाल ओझा
🌺 विशेष योगदान:
नगरसेविका व महिला पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग
🌸 ज्येष्ठ महिला, युवती, माहेरवाशिणींची लक्षणीय उपस्थिती
🌸 आरती – महाप्रसाद – भक्तीमय वातावरण
🌸 जुन्या आठवणींना उजाळा, श्रद्धेचा जागर
🪔 गोदावरी मातेच्या जयघोषात गंगाखेडची आध्यात्मिक ओळख अधिक ठळक!

Check Also

शेवाळा येथे 30 वय वंदना कार्ड वाटप

हिंगोली, (दि. ६ ): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी “माझं गाव आरोग्य …