17/07/26
Breaking News

सेलूत सात जूनला कविता मिरगाच्या काव्य मैफल, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी )
येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने रविवार ( दि. ०७ ) जून रोजी नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील नामवंत कवींची बहारदार काव्य मैफल ‘ कविता मिरगाच्या’ कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या ‘कविता मिरगाच्या’ उपक्रमाचे हे १३ वे वर्षे असून या वर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा. वीरा राठोड ( कन्नड), डॉ. ऊर्मिला चाकूरकर ( पैठण), प्रा.सखाराम डाखोरे ( मुंबई ), राजकुमार नायक ( हिंगोली ), प्रेमानंद शिंदे ( वसमत ) हे निमंत्रित कवी काव्य मैफलीत सहभागी होणार आहेत. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवी डॉ. अशोक पाठक करतील.कवी संमेलनास उपस्थित राहाण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सर्जेराव लहाने, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ.शरद ठाकर, महेशराव खारकर, डॉ.सतीश मगर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, रमेश नखाते,रामराव गायकवाड, रामराव बोबडे, एकनाथ जाधव, चंद्रशेखर मुळावेकर, माधव गव्हाणे, सुभाष मोहकरे, बाळू बुधवंत यांनी केले आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …