18/07/26
Breaking News

प्रवाशांना पेढे व पुष्प देत पाथरी बसस्थानकात एसटीचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पाथरी | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाथरी आगारात विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचे पेढे वाटप करून तसेच पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत प्रवाशांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला प्रवाशांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बसस्थानक परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रवाशांना एसटीच्या सेवांविषयी माहिती देण्यात आली तसेच सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवासाचा संदेशही देण्यात आला.
या कार्यक्रमाला पाथरी आगाराचे आगार व्यवस्थापक हणमंत चपटे, स्थानक प्रमुख गजानन येडले, आगार लेखाकार विनायक देशपांडे, प्रभारक अशोक तालेवार, वाहतूक नियंत्रक विश्वनाथ होळकर, विश्वंभर भोकरे, गणेश वाळके, विजय सूर्यवंशी, मारोती परांडकर, वरिष्ठ लिपिक शंकर चपाटे, संदीपान कऱ्हाळे, सुनील तळेकर, वाहक सुरेश पवार, विद्या उगले तसेच आगारातील चालक, वाहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी एसटी महामंडळाच्या ७८ वर्षांच्या प्रवासाचा गौरवपूर्ण आढावा घेत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना जोडणारी एसटी सेवा आजही सर्वसामान्यांची विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एसटीच्या प्रगतीसाठी आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …