29/07/26
Breaking News

खडकपुरा गल्लीत गोदामावर धाड,92 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड,दि 12 
गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीत दि १० जुनच्या मध्यरात्री अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री अचूक धाड टाकत मोठी कारवाई केली. रात्री ठीक २ वाजता झालेल्या या कारवाईत विमल, राजनिवास डायरेक्टर या ब्रँडचा ₹92,248 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. अचानक झालेल्या छाप्यामुळे आरोपी गौरव चौधरी याला पळ काढण्याची संधीच मिळाली नाही. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत आरोपीसह मुद्देमाल जप्त केला.
ही धडाकेबाज कारवाई गजानन सर्वसे, पि एस आय चंदणसिंह, परिवार माणिक, वाघ आदी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. या धाडीमुळे गंगाखेड परिसरातील गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून, शहरात अशाच सातत्यपूर्ण कारवाया झाल्यास गंगाखेड गुटखा-मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.
: धक्कादायक वास्तव
शहरातील शाळा–महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पोलिस स्टेशन, न्यायालय परिसर तसेच गल्लोगल्ली सर्रासपणे गुटखा सहज उपलब्ध असल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर गांजा विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसते. अनेक शालेय विद्यार्थी या नशेच्या विळख्यात अडकत असल्याचे निदर्शनास येत असताना, प्रशासनाने मनावर घेतले नाही तर हा प्रकार असाच बेधडक सुरू राहणार—असा संतापजनक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Check Also

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …