सोनपेठ दि.१५(प्रतिनिधी) राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पुर्वी दिलेले कर्ज माफीचे अश्वासन पुर्ण करुन खरे रामभक्त असल्याचे दाखवावे असे आवाहन शेतकरी नेते बच्चु कडु यांनी नरवाडी येथील हक्क सभेत बोलताना केले .
शेतकरी नेते बच्चु कडु यांनी परभणी जिल्हात शेतकरी शेतमजूर मेंढपाळ व इतर घटकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी हक्क यात्रेचे आयोजन केले होते.या हक्क यात्रेचा समारोप सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे दि १४ रवीवार रोजी रात्री एका हक्क सभेने करण्यात आला . या सभे साठी सोनेपठ तालुक्यातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत बोलताना बच्चु कडु यांनी शेतकऱ्यांनी जाती साठी मोठ लढा दिला आता शेतकऱ्यांनी माती साठी उभे राहण्याची गरज व्यक्त केली. येणाऱ्या दिवसात कापुस सोयाबीन तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात पडणार असुन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे ही ते म्हणाले . निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आमचे सरकार निवडुन द्या कर्जमाफी करतो असे वचन दिले होते . देवेंद्र फडणवीस हे रामभक्त आहेत रामाच्या “प्राण जाई पर वचन न जाई “या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वचन निभावून तेच खरे राम भक्त व रामाच्या आदर्शावर चालणारे असल्याचे दाखवुन द्यावे असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांना केले .
शेतकऱ्यांच्या कर्विजमाफी सह विविध मागण्यासाठी २८ तारखेला बुटीबोरी नागपुर येथे करण्यात येणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले .
या सभे साठी मंचावर भारत राष्ट्र समितीचे सुधीर बिंदू प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ, शिवलिंग बोधणे, हेमचंद्र शिंदे,सभेच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक अशोक मस्के यांनी केले तर शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेचे सुत्र संचलन उध्दव सुरवसे यांनी केले.
या सभेसाठी माऊली जोगदंड , सुभाष जोगदंड,दिपक खुडे माणिक राठोड यांच्या सह नरवाडी येथील ग्रामस्थांनी परीश्रम घेतले
फोटो :- नरवाडी येथील हक्क सभेत बोलताना बच्चु कडू व सभेला उपस्थित शेतकरी
Shabdraj www.shabdraj.com