04/02/26
Breaking News

वाचकांची व विद्यार्थ्यांची पाऊले ग्रंथालयाकडे वळावीत – उपेंद्र बेलुरकर

सेलू ( प्रतिनिधी )
वाचक- विद्यार्थी यांचे पाऊले ग्रंथालयाकडे वळली पाहिजेछ तरच वाचन संस्कृती टिकेल.वाचन संस्कृतीत वाढ व्हावी,वाचन संस्कार रुजावेत यासाठी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय,सेलू नेहमीच पुढाकार घेत असते त्या बद्दल ग्रंथालयाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहेत असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे उपेंद्र बेलुरकर यांनी (ता.१५) बुधवार रोजी केले.

अभिजात भाषा सप्ताह व वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथालयाने आयोजित केलेल्या स्मरण शक्ती वाढवा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कविता सादरीकरण स्पर्धा, या स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महेश खारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महेश खारकर म्हणाले, आपण वाचकांना काय ज्ञान दिलं म्हणजे वाचक ग्रंथ वाचनाकडे आला पाहिजे. आपणं विविध उपक्रमाद्वारे वाचकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्रंथालय हे वाचकांच्या दृष्टीने अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी वेळ देत आहेत . जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आमचा संकल्प गेला जावा आणि त्यांच्याशी हितगुज करता यावे हे आम्ही करतो आहोत.
यावेळी गुणवंत विद्यार्थीं व परीक्षकांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, सर्जेराव लहाने,जी.ए.गुंजकर,संजय विटेकर,गजानन शितळे,माधव गव्हाणे,अनंत मोगल सदाशिव मानवतकर, सुधीर देशपांडे,राजश्री सोन्नेकर,दिक्षा शेजुळ, वैशाली काटेकर,शेख अन्वर इत्यादी यांच्यासह विद्यार्थी,पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शरद ठाकर यांनी केले तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री देशमुख व पांडुरंग पाटणकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालय कर्मचारी महादेव आगजाळ, पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके,यांनी परिश्रम घेतले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …