04/02/26
Breaking News

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्‍चित, पहा कुठे कोणाला मिळणार संधी

परभणी – राज्यातील ३४ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदासाठी आज आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे.

रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड या ठिकाणी महिला मागस प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे.

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसोबतच निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. आयोगाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राजकीय पक्षांना आपापल्या रणनीती आखण्यास मदत होणार आहे. लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.

Check Also

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड विशेष गाडी धावणार

सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा नांदेड – सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण …