14/07/26
Breaking News

भट्ट कॉलनीतील वीज समस्या तात्काळ सोडवा; आ. तान्हाजी मुटकुळे यांचे महावितरणला निर्देश

हिंगोली / प्रतिनिधी – शहरातील भट्ट कॉलनी परिसरात मागील काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी भाजपा नेते आमदार तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. या तक्रारीची दखल घेत आमदार मुटकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भट्ट कॉलनीतील वीज समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.

 

भट्ट कॉलनी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना, विशेषतः लहान मुले व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी आमदारांकडे धाव घेतली. यावर आमदार मुटकुळे यांनी संबंधित महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या भागातील प्रमुख अडचणी जाणून घेतल्या.

 

हा बिघाड नेमका कशामुळे होत आहे, याचा शोध घेऊन तिथे नवीन रोहित्र किंवा इतर तांत्रिक सुधारणा काय कराव्या लागतील, याचा आराखडा तात्काळ तयार करण्यास त्यांनी सांगितले. तसेच, या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, गरज पडल्यास जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा,के,के शिंदे,पत्रकार राकेश भट्ट,भाजपा प्रवक्ता विलास गोरे,पप्पू भट्ट,गोल्डी सोनी,नितीन जैस्वाल,नगरसेवक हमीद प्यारेवाले,बाबाराव घुगे,रजनीश पुरोहीत,पवन उपाध्ये,समिर भिसे उपस्थित होते,

Check Also

हिंगोली जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न!

​१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी …