04/02/26
Breaking News

इन्स्टाग्रामवर रेट्रो साडीतील फोटोचा ट्रेंड; असा बनवा तुमचा फोटो

अॅक्शन फिगर-मेकिंग आणि स्टुडिओ घिब्ली-शैलीतील पोर्ट्रेट्सनंतर आता इन्स्टाग्रामवर आणखी एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. या ट्रेंडमुळे यूजर्सना त्यांच्या साध्या फोटोंना थेट १९९० च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे रेट्रो पोर्ट्रेटमध्ये बदलण्याची संधी मिळते. गुगल जेमिनीच्या ‘नॅनो बनाना’ टूलच्या मदतीने तयार होणाऱ्या या एडिट्समध्ये शिफॉन साड्या, गोल्डन-आवर लाइटिंग आणि जुन्या सिनेमॅटिक पोस्टर्सची आठवण करून देणारी पार्श्वभूमी दिसते.

AI अॅप्स वापरा – Canva, Fotor, Remini, Google Gemini, MidJourney, Leonardo AI.
Prompt लिहा –
A retro Bollywood style woman wearing a vintage saree, 1970s look,
traditional jewelry, winged eyeliner, retro hairstyle,
photographed in sepia tone.

तुमचा फोटो अपलोड करा – नंतर त्यावर “retro saree filter” किंवा “vintage outfit” ट्रान्सफॉर्मेशन लागू करा.
फिल्टर्स वापरा – Instagram, Snapseed, Lightroom मध्ये “Vintage”, “Sepia”, “Retro Film” असे फिल्टर टाका.

तुमचे ‘रेट्रो स्टाईल साडी’ फोटो कसे बनवाल?
स्टेप 1: गुगल जेमिनी उघडा
तुमच्या फोनवर जेमिनी अॅप डाउनलोड करा किंवा डेस्कटॉपवर उघडा. तुमच्या गुगल खात्यात लॉग इन करा.

स्टेप 2: एडिटिंग मोडमध्ये जा
जेमिनीवर, बनाना आयकॉन शोधा आणि “Try Image Editing” वर टॅप करा.

स्टेप 3: तुमचा फोटो अपलोड करा
एक स्पष्ट, एकट्याचा पोर्ट्रेट निवडा, ज्यात तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल. ग्रुप फोटो किंवा अस्पष्ट सेल्फी टाळा.

स्टेप 4: प्रॉम्प्ट टाका
खाली दिलेले व्हायरल प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट करा किंवा तुमचा स्वतःचा प्रॉम्प्ट तयार करा. प्रॉम्प्ट साडीचा रंग ते लाइटिंग स्टाइलपर्यंत सर्व काही नियंत्रित करतो.

स्टेप 5: तयार करा आणि सेव्ह करा
Generate वर क्लिक करा आणि काही सेकंद थांबा. AI तुमचे रेट्रो साडी पोर्ट्रेट तयार करेल, जे तुम्ही इन्स्टाग्राम रील्स किंवा स्टोरीजवर शेअर करू शकता.

 

व्हायरल होत असलेले प्रॉम्प्ट:
Black Saree Prompt – “Convert this person into a retro vintage grainy but bright image, black party-wear saree, 90s film aesthetic… Lighting is warm, with golden sunset tones evoking golden hour glow.”

White Saree Prompt – “Create a 4K HD realistic portrait of a woman in a translucent white polka dot saree… Small pink flower tucked behind her ear, soft serene expression, cinematic profile shadow.”

Red Saree Prompt – “Subject draped in an elegant red saree, with wavy hair cascading over shoulders, white flowers tucked behind the ear, warm-toned wall in background, retro artistic vibe.”

Check Also

‘दशावतार’चा जागतिक गजर! केवळ तीन दिवसांत मिळवला तब्बल…

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘दशावतार’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या चित्रपटाने विक्रमी कामगिरी …