04/02/26
Breaking News

सेलू नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी साइराज बोराडे यांची निवड

स्वीकृत सदस्य पदी बोराडे, आडळकर व काकडे यांची निवड

सेलू / प्रतिनिधी – आज दि १४ जानेवारी रोजी दुपारी नगर परिषद सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सेलू नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी साइराज बोराडे यांची एकमताने निवड झाली आहे.

 

यावेळी मुख्याधिकारी तुकाराम कदम , उप मुख्याधिकारी बी एस चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती .
तर स्वीकृत सदस्य पदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे ,साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर व कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे .
आज झालेल्या नगर परिषदेच्या पहिल्या सर्व साधारण सभेत उपाध्यक्ष पदासाठी साइराज मुकेश बोराडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली .तसेच स्वीकृत नियमानुसारच तीन सदस्या साठी फक्त भाजप कडून विनोद बोराडे ,अशोकराव काकडे तर राष्ट्रीय काँग्रेसकडून हेमंत राव आडळकर यांचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली .अशी माहिती मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .

 

नगर परिषदेच्या नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच येथील विद्यानगर मधील श्रीरामजी भांगडीया उद्यानात भांगडीयाजींचा पुतळा तसेच नगर परिषद सभागृहाला त्यांचे नावं देण्यात येणार आहे .तसेच नगर परिषदेच्या लोगो मध्ये शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब यांचा फोटो घेण्याचा ठराव संमत करण्यात आला असून लवकरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हा उदघाटन व लोकार्पण सोहळा घेण्यात येणार आहे .असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले .

 

शहरात गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या श्रीनिवास उघडे यांच्या उपोषणाचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता शहरात भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सर्व जागा या नियमाला धरून नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी दिल्या आहेत .व याबाबत ची सर्व कागदपत्र उपोषण कर्त्याला लवकरच देण्यात येतील .व यात कांही गैर असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी असे स्पष्ट केले . तसेच लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन आवश्यक ती सर्व माहिती पत्रकारांना देण्यात येईल असेही सांगितले .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …