04/02/26
Breaking News

पाथरीत निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

पाथरी प्रतिनिधी
परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी साठी नियुक्त केलेल्या केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी यांचे द्वितीय प्रशिक्षण आय टी आय कॉलेज विटा रोड पाथरी येथे शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 26 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  श्रीमती संगीता चव्हाण व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार  शंकर एन हांदेशवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांनी पिपिटी द्वारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना सविस्तर माहिती दिली. व आवश्यक त्या सूचना दिल्या.प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येणाऱ्या अडचणींबाबत माहिती देऊन त्या बाबत घ्यावयाच्या खबरदारीच्या सूचना केल्या.तसेच मास्टर ट्रेनर  अजय भुसारे,गजानन कुलकर्णी, सचिन शिंदे यांनी ईव्हीएम डेमो द्वारे सर्वांना प्रशिक्षण दिले व ईव्हीएम हाताळणी सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून करून घेतली.काही कर्मचारी यांनी शंका विचारून त्याचे मास्टर ट्रेनर कडून निरसन करून घेतले.टपाली मतदान करण्यासाठी विशेष कक्ष प्रशिक्षण स्थळी उभारले होते त्यात मतदार असलेल्या नियुक्त कर्मचारी यांनी मतदान केले.आणखी दोन दिवस आय टी आय कॉलेज येथे टपाली मतदान करता येणार आहे.प्रशिक्षणास गट विकास अधिकारी शैलेश वाव्हळे,गट शिक्षण अधिकारी मुकेश राठोड,नायब तहसीलदार  वसंत महाजन,नायब तहसीलदार  रमेश धोपे,नायब तहसीलदार  हेमंत सुजलेगावकर,सहाय्यक महसूल अधिकारी श्री रघुनाथ केसकर, मिडिया नोडल अधिकारी  संदीपान घुंबरे,श्री जामकर,श्री आर ए मनेरे, नरहरी पांचाळ,आकाश क्षीरसागर सर्व निवडणूक नियुक्त क्षेत्रीयअधिकारी,कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

Check Also

जिल्हा परिषदेची निवडणुक पुढे ढकलली….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा …