24/03/26
Breaking News

बारामती रन वेवर जाऊन शरद पवारांनी घेतली माहिती, मन हेलावणारे दृश्य

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. यावेळी  शरद पवारांनी थेट बारामती गाठली आणि हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली.

 

शरद पवार हे मुंबईत सिल्वर ओक या निवासस्थानी होते. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीनंतर शरद पवार सिल्वर ओकवरून बारामतीला रवाना झाले. बारामतीत शरद पवार पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यासोबत हेलिकॉप्टरने बारामतीत उतरले. हेलिकॉप्टरमधून उतरताच शरद पवार यांनी विमान दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर अजितदादांचे पार्थिव ठेवलेल्या ठिकाणी रवाना झाले.

विमान बारामतीला येण्यासाठी सकाळी मुंबईतून ८ वाजून १० मिनिटांनी निघालं होतं. बारामतीत ८.५० मिनिटांनी विमानतळावर उतरणार होतं. मात्र त्याआधी काही क्षण आधीच विमानाचा अपघात झाला. दृश्यमानता कमी असल्यानं पायलटला धावपट्टी दिसली नाही आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

विमानातील प्रवाशांची माहिती

1. माननीय अजित दादा पवार साहेब

2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव

3. पायलट कॅप्टन सुमित कपूर

4. कॅप्टन संभवी पाठक

5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

Check Also

अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय,रोहित पवारांनी सगळ सांगीतलं

अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित …