24/03/26
Breaking News

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केले निषेध आंदोलन 

परभणी,दि 14 (प्रतिनिधी) भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले.

पहलगाम हल्ल्यामध्ये 26 माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून खेळल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान सामना खेळवला जात आहे.याला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला.त्यासाठी राज्यात माझ कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात येत आहे.परभणीत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी  वंदना कदम, संगिता टेहरे, मिरा कहाळे, सुचिता, वेता, गिरी, संगिता संगित चट्टे, अर्चना निपाने, दिया बीरूळ, मदा वाघमारे, संगिता परनाळे, गोखणा नखाते, अनुसया फुटके, स्वाती बैजमवार, सविता तावडे, संतोषी देवके, योगिता डहाळे, लिना फुटाणे, श्यामा चांडक, खेता लवांदे, बैर छाया गवारे, वैशाली लवांडे, रेजना इदगे यांनी सहभाग घेतला.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …