सेलू / प्रतिनिधी – भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध म्हणून माझ कुंकू माझा देश या आंदोलन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शहरात छत्रपती शिवाजी नगर मधील आपला दवाखाना परिसरात येथे रविवार (ति.14) निषेध आंदोलन केले.
पहलगाम हल्ल्यामध्ये २६ माता-भगिनींचे कुंकू पुसल्या गेले. त्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पहलगाम मधील दहशतवाद्यांन वर अद्याप कारवाई झाली नाही. आणि तरीही व्यापाराच्या दृष्टिकोनातून खेळल्या जाणाऱ्या भारत पाकिस्तान सामना खेळवला जात आहे.याला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला.त्यासाठी राज्यात माझ कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात येत आहे.परभणीत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगल कथले यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदवला
Shabdraj www.shabdraj.com