पुणे,दि 19 (प्रतिनिधी) : पुणे सिखवाल ब्राह्मण समाजाचा २५ वा वर्धापन दिन रजत जयंती सोहळा गुलटेकडी येथील कुमावत समाज भवनात उत्साहात साजरा झाला. “जय ऋषी शृंगीं” च्या जयघोषात सोहळ्याची सुरुवात झाली. समाजाचे अध्यक्ष जितेंद्रजी तिवारी, उपाध्यक्ष कमलजी पंडित, सचिव इंदर कुमारजी सिखवाल आणि नाथूलालजी जोशी विजयजी जोशी, कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
मुख्य अतिथी म्हणून राधेशामजी तिवारी (हैद्राबाद), विशिष्ट अतिथी घनशामजी जोशी (अ. भा. सिखवाल ब्राह्मण समाज, इंदोर), विशेष अतिथी दिनेशजी सिखवाल (अध्यक्ष, मुंबई सिखवाल ब्राह्मण समाज) व सुनीलजी तिवारी (युवा समाजसेवक, हैद्राबाद) उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. उज्ज्वला गौड शर्मा यांनी विशेष धावती भेट दिली.
स्वागत, दीपप्रज्वलन व महर्षी शृंग महाआरतीनंतर शाम-मोना भोरे यांच्या ऑर्केस्ट्रामधून जुन्या गाण्यांची सुरेल मेहफिल रंगली. सूत्रसंचालन नीता मुधाळे यांनी केले. महाप्रसादानंतर समाजातील बांधव-भगिनी व युवक-युवतींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. समाजबंधुत्वाच्या उत्साही वातावरणात व पंचतत्त्वाच्या आशीर्वादात रजत जयंती सोहळ्याची सांगता झाली.
Shabdraj www.shabdraj.com