17/07/26
Breaking News

मस्तान शहा नगर येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिर 

हिंगोली,दि 10 ः
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) 10 वर्षपूर्ती निमित्त शहरातील आरोग्य केंद्र मस्तानशहा नगर येथे आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गिरी यांची उपस्थिती होती.
शिबिरामध्ये गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. जोखीमग्रस्त (High Risk) गर्भवती महिलांना विशेष आरोग्य सेवा व मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच सर्व ANC मातांची हिमोग्लोबिन (HB), रक्तातील साखर (Sugar), HIV, रक्तदाब (BP), वजन (Weight) तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. मातांना गर्भधारणेदरम्यान घ्यावयाची काळजी, पोषण आहार व नियमित तपासण्यांचे महत्त्व याबाबत समुपदेशन करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रदीप आंधळे, श्री. रोडे, पंजाब गायकवाड, गणेश ठोके शेख इब्राहिम अमाई नरवडे श्रीमती प्रियंका राठोड श्रीमती कल्पना कुठे श्रीमती आरती घोषीर सुनिता सुपलकर स्वाती कांबळे व आशा वर्कर यांनी पुढाकार घेतला

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …