सेलू दि ०२(प्रतिनिधी.)येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आज दि ०२ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शिष्यवृती परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये तब्बल 555 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने व कल्याणम एज्युकेशन सोसायटी व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय माजी विद्यार्थी संघ आयोजित इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तब्बल 555 विद्यार्थी प्रवीष्ठ झाले.
विद्यार्थ्यामध्ये असलेल्या स्पर्धात्मक गुणाला चालना देण्यासाठी व पुढील तयारीसाठी या परीक्षेचा निश्चित उपयोग होईल असे मत गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी व्यक्त केले.तसेच पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाल्या बद्दल शाळेचे व आयोजकांचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले.
या परीक्षेला गटविकास अधिकारी उदय जाधव,पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, केंद्रप्रमुख विजय चिकटे, अरुण राऊत, श्री के.बा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष ललीत बिनायके,सदस्य जयंत दिग्रसकर, डॉ प्रवीण जोग आदिनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या तालुकास्तरीय परीक्षेच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे व मुख्याध्यापक संजय धारासुरकर व सिद्धार्थ एडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक योगेश ढवारे, नरेश पाटील,कल्याणम एज्युकेशन सोसायटीचे संचालक निशिकांत पाटील,निधी पाटील,दिलीप चव्हाण, कृष्णा पांचाळ, कालिदास जोशी, कैलास राऊत,नामदेव क्षीरसागर, शिक्षकेतर कर्मचारी विठल काळे, अण्णासाहेब गायकवाड, बाबासाहेब बदाले, श्याम मुंडे आदिनी अथक परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com