परभणी – येथील शारदा महाविद्यालयात परभणी समाचार चे संपादक, शिक्षणमहर्षी मा. हेमराजजी जैन यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी हेमराजजी जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व . हेमराजजी जैन यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. हेमराजजी जैन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे सर्व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षासाठींचे मोफत मार्गदर्शन तसेच मोफत ग्रंथ व अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार, उद्घाटक म्हणून मा. अनिल जैन तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानदा क्लासेसचे संचालक मा. अशोक चोपडे उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर सुनिल जैन, डॉ. नम्रता जैन, प्राचार्य संजय जोशी, मुख्याध्यापक नितीन जैस्वाल, मुख्याध्यापक सौ. राधिका जोशी, उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, स्पर्धा परीक्षा केंद्र प्रमुख प्रा. डॉ. नितीन बावळे, स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. डॉ. सुरेश खिस्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मा. अशोक चोपडे म्हणाले की, आजच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रातील निवड स्पर्धा परीक्षेमधूनच होते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी डोळसपणे आपल्या करिअरची निवड करून वाटचाल केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
तर अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी स्पर्धा परीक्षेचे सविस्तर स्वरूप व महत्व सांगून जग हे स्पर्धेचे असून या स्पर्धेच्या जगात सर्व विद्यार्थ्यांनी सजग राहून व जिद्दीने अभ्यास करून आपले ध्येय साध्य केले पाहिजे असे मत प्रतिपादन केले. या केंद्राद्वारे दररोज दुपारी 1 ते 2 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटीमधील सर्व शिक्षक वृंद व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुरेश खिस्ते यांनी प्रास्ताविक प्रा. डॉ. नितीन बावळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अविनाश पांचाळ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जयपुरकर, संतोष येडके, राजाराम मूत्रटकर, तुकाराम पवार, कु. तनुजा रासवे व श्रीमती सुनंदा राजगुरू यांनी प्रयत्न केले.
Shabdraj www.shabdraj.com