18/07/26
Breaking News

राज्य क्रीडा स्पर्धेत खेळून एसएससी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सेलू : (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत कु. मुक्ता यादवराव घोडके हिने ९३.८० टक्के, कु. सृष्टी कैलासराव सोळंके हिने ९३.२० टक्के, तर ज्ञानराज जयंत बावणे याने ८९.४० टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

नूतन विद्यालयातील तब्बल २१ खेळाडूंनी राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी होत एसएससी परीक्षेत गुणवाढीचा लाभ घेत उल्लेखनीय यश मिळविले. यामध्ये घोडके मुक्ता यादवराव, गायके गायत्री दत्ता, ताठे सई रावसाहेब, चव्हाण प्रतीज्ञा विजय, शिंदे अंकिता दत्ता, अर्जुने साक्षी प्रभाकर, गोरे कार्तिकी संजय, मोरे श्रेयाशी धोंडीराम, मैड कृष्णा रमेश, सोळंके विश्वजीत पांडुरंग, मुंढे प्रतीक संजय, बावणे ज्ञानराज जयंत, बोकन सार्थक धोंडीराम, वाघ अभय हनुमान, घोडके श्रावणी प्रकाश, घोडके भाग्यश्री गंगाधर, सोळंके सृष्टी कैलासराव, क्षीरसागर कृष्णा राजकुमार, गात गोविंद गणेश, राऊत समर्थ सुरेश व धापसे अनंत अविनाश या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, गणेश माळवे, क्रीडा विभाग प्रमुख प्रशांत नाईक, संजय भुमकर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …