हिंगोली,दि 15
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत शहरात खंजर शस्त्र जप्त केले आहे.याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक गस्त घालत असताना शैलेश रोहिदास राऊत रा.कारखाना रोड वसमत,कोंडीबा बालाजी क्षीरसागर रा. कारखाना रोड वसमत यांना वसमत शहरातील हिरो शोरूम जवळ ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्यांचे जवळ एक धारदार घातक हत्यार खंजर मिळून आले. त्यांना जागीच पकडून पोलीस स्टेशन वसमत शहर येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसातर्फे आवाहन करण्यात येते की कोणी अवैध हत्यार बाळगू नये अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल.
सदरची कार्यवाही डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री मोहन भोसले पोनि स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अमलदार शिवाजी जालमिरे ,आकाश टापरे ,ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने केली आहे
Shabdraj www.shabdraj.com