04/02/26
Breaking News

पाथरीत सुफी संत हजरत सय्यद सादात यांच्या उर्स सोहळ्याला सुरवात

पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – येथील जगप्रसिद्ध सुफी संत हजरत सय्यद सादात (रजि.) यांचा वार्षिक उर्स सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पाथरी येथे साजरा होत आहे.या निमित्ताने शहरातील जिल्हा परिषद मैदानावर भव्य उर्स (जत्रा)भरली असून,प्रशासकीय आणि उर्स कमिटीच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

 

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी म्हणून शिवसेना नेते सईद खान व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आसेफ खान यांच्या वतीने कव्वाली आणि मुशायराचे यावर्षी उर्सचे औचित्य साधून जिल्हा परिषद मैदानावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दोन मुख्य आकर्षणे राहतील यामध्ये येत्या ८ तारखेला रात्री जिल्हा परिषद मैदानावरील मुख्य रंगमंचावर नामवंत कव्वालांच्या उपस्थितीत कव्वालीचा कार्यक्रम पार पडणार आहे.सूफी संगीताची आवड असणाऱ्या श्रोत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.याचप्रमाणे ९ तारखेला देशातील नामवंत कवी आणि शायर आपल्या शब्दांनी पाथरीकरांची मने जिंकण्यासाठी येणार आहेत. साहित्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी हा मुशायरा विशेष आकर्षणाचे केंद्र असेल.
जत्रेत मनोरंजनाची साधने म्हणून जिल्हा परिषद मैदानावर विविध पाळणे,खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,खेळण्यांची दुकाने आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मोठी बाजारपेठ सजली आहे.शहरात आणि परिसरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

उर्स कमिटी आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करण्यात आले आहे की,या उर्समध्ये महिला आणि बालकांसाठी सुरक्षित आणि आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.पाळणे आणि विविध खेळांच्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन होणार आहे.तरी पाथरी शहर व परिसरातील सर्व माता-भगिनींनी आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक उर्सचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …