05/02/26
Breaking News

सेलूत भर पावसात केला विजय कारगिल दिवस साजरा

माजी सैनिकांनी केला भारत माताचा जयघोष

सेलू / प्रतिनिधी – शहरातील क्रांती चौक मशालीजवळ सेलू शहरातील माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक भगीरथ गायकवाड यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले.

 

ते म्हणाले की ३मे १९९९ते २६ जुलै १९९९ हे तब्बल तीन महिने विजय युद्ध सुरू होते १९९९मध्ये पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील उंच पर्वतीय भागांवर गुप्तपणे कब्जा केला या अतिक्रमणाला प्रतिउत्तर म्हणून भारताने ऑपरेशन विजय सुरू केले ज्यामध्ये भारतीय सैन्याने कठीण हवामान आणि दुर्गम भूभागात लढा देत हे भाग परत मिळवले या संघर्षात ५२७ भारतीय सैनिकांचे आपले प्राण गमावले या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी २६ जुलै हा दिवस “कारगील विजय दिवस ” म्हणून साजरा केला जातो.

 

तसेच क्रांती चौकातील मशालीस २६ व्या कारगील विजय दिवसा निमीत्ताने माजी सैनिक कॅप्टन जे पी शर्मा, विठ्ठल सिंह ठाकुर ,विठ्ठलराव शिंदे ,लक्ष्मणराव शेरे अखिल भारतीय ग्रामपंचायत चे तालुका अध्यक्ष सतीश जाधव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड, निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे, पद्माकर कुलकर्णी, भगवान भराटे, शिवाजीराव झोल ,सुरेशराव रोडगे, माणिकराव गिरी ,सदाशिव पौळ, ज्ञानेश्वर कावळे ,मारुती भिसे, आदी माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी आकाश जाधव , योगेश कवडे, अंबादास ईघवे अदिनी परीश्रम घेतले

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …