26/06/26
Breaking News

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी… तिरुपती-साईनगर शिर्डी-तिरुपती विशेष गाडीच्या 18 फेऱ्या

परभणी,दि 25 ः
प्रवाशांनी होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे तिरुपती- साईनगर शिर्डी – तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या 18 फेऱ्या करणार आहे, ते पुढील प्रमाणे : –

गाडी क्रमांक 07637 तिरुपती-साईनगर शिर्डी विशेष गाडी : हि विशेष गाडी तिरुपती येथून ऑगस्ट महिन्यात 03, 10, 17, 24 आणि 31 तारखेला तर सप्टेंबर महिन्यात 7, 14, 21 आणि 28 तारखेला दर रविवारी सकाळी 04 वाजता सुटेल आणि रेणीगुंठा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, चीराला, तेनाली, गुंटूर, सत्तेनापल्ले, सिकंदराबाद, लीम्गाम्पल्ली, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद, नगरसोल, मनमाड, कोपरगाव मार्गे साईनगर शिर्डी येथे सोमवारी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07638 साईनगर शिर्डी – तिरुपती विशेष गाडी : हि विशेष गाडी साईनगर शिर्डी येथून ऑगस्ट महिन्यात 04, 11, 18 आणि 25 तारखेला तर सप्टेंबर महिन्यात 01, 08, 15, 22 आणि 29 तारखेला दर सोमवारी सायंकाळी 19.35 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच तिरुपती येथे बुधवारी मध्यरात्री 01.30 वाजता पोहोचेल.
या विशेष गाड्यांमध्ये 2AC, 3AC, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून 18 डब्बे असतील.

Check Also

“फसवणूक खपवून घेतली जाणार नाही”-आमदार डॉ. रत्नाकर गुट्टेंचा थेट इशारा

गंगाखेड (प्रतिनिधी): शेती हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण भारताचा श्वास आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता …