24/03/26
Breaking News

विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व रक्षाबंधन साजरा

सेलू/प्रतिनिधी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन(९ऑगस्ट )व रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्य सह शिक्षक विनोद मंडलिक यांनी स्वा.वि. दा. सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.ते पुढे म्हणाले की , स्वा. सावरकरांचे जीवन संघर्षमय होते ,अनेक क्रांतिकारकांना त्यांचे विचार प्रेरणादायी ठरले.भाषा समृद्धीसाठी त्यांनी प्रयत्न केले.मराठी ही थोर आणि प्राचीन भाषा आहे,जगाच्या पाठीवर भाषा पोहचवण्याचे काम वि.दा. सावरकर यांनी केले असे मत आयोजित क्रांती दिनाच्या कार्यक्रमात विनोद मंडलिक यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक शंकर शितोळे,अनिल कौसडीकर यांची उपस्थिती होती. बहीण व भाऊ यांच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन असतो , विश्वास व आपुलकी या दोन गोष्टींवर नाते वृद्धिंगत होते असे मत मुख्याध्यापक शंकर शितोळे यांनी व्यक्त केले.सुत्रसंचालन व आभार अमोल गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …